भारतीय भाषाओं द्वारा ज्ञान

Knowledge through Indian Languages

भारतवाणी बद्दल

भारतवाणी काय आहे? प्रकल्पाच्या मागचा उद्देश काय आहे?

 • भारतवाणी एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश मल्टिमिडीयाचा (पाठ, ध्वनी, दृश्य आणि चित्र) उपयोग करून भारतातील सर्व भाषांबाबत आणि भारतीय भाषांमध्ये उपलब्ध ज्ञानाला एका पोर्टलवर (संकेतस्थळ)उपलब्ध करून देणे आहे. हे संकेतस्थळ समावेशी, संवादात्मक आणि गतिशील असेल. डिजिटल इंडियाच्या या युगात भारताला मुक्त ज्ञानाचा समाज बनवण्याची ही कल्पना आहे.

भारतवाणी ज्ञान पोर्टलचे उपभोक्ते कोणकोण आहेत?

 • भारतवाणीचा उपयोग विभिन्न सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक (औपचारिक आणि अनौपचारिक) पृष्ठभूमी असलेले तसेच सर्व वयोगटातील लोक करू शकतात. म्हणजेच भारतवाणी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच भारतातील सर्व नागरिकांना सेवा प्रदान करेल.

भारतवाणीसाठी (आशयाचे) सामग्रीचे संकलन कसे करायचे?

 • भारतवाणी भारताच्या सर्व सरकारी आणि गैरसरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, शैक्षणिक मंडळ, पाठ्यपुस्तक संचलनालय,विश्वविद्यालय, शैक्षणिक आणि प्रकाशन गृहे इत्यादींपासून ज्ञान आशयाचे संकलन मल्टीमिडीयाच्या स्वरुपात सर्व समाविष्ट भाषांमध्ये करणे आहे.
 • भारतवाणी वैयक्तिक संस्थांना सुद्धा आग्रह करते की संभावित ऑनलाइन प्रयोगासाठी ते आपल्या सामग्रीची देवाण-घेवाण करतील.
 • सामग्रीचे संकलन आणि प्राथमिकता निर्धारित करून अनुमोदनासाठी प्रस्तुत केले जाईल. संपादक मंडळाद्वारे प्रस्तुत शिफारशींवर सल्लागार समितीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.
 • भारतवाणीचे धेय्य ज्ञान सामग्री प्रकाशित करणे आहे. सोबतच सल्लागार समितीद्वारे विशिष्ठ मापदंडाच्या आधारे निर्धारित कथेत्तर साहित्य सुद्धा प्रकाशित करेल.

भारतवाणी सामग्रीची गुणवत्ता कशा प्रकारे निर्धारित करेल?

 • भारतवाणी सामग्रीच्या प्रकाशनाची सुरुवात विषय विशेषज्ञांच्या द्वारे निर्माण केलेली सामग्री आणि प्रतिष्ठित संस्थांद्वारे प्रकाशित केलेल्या सामग्रीवरून करेल. या क्रमवारीत सर्वात अगोदर भारतीय भाषा संस्थानांद्वारे प्रकाशित सामग्रीला घेतले जाईल.
 • नवीन सामग्रीच्या प्रकाशनाच्या संदर्भात भारतवाणी कडून प्रत्येक भाषेसाठी निवडलेल्या संपादक मंडळाकडून निर्णय घेतला जाईल.
 • कोणत्याही प्रकारची त्रुटी नसलेल्या सामग्रीच्या प्रकाशनासाठी एक मंडळ स्थापन केले जाईल.

काय भारतवाणी भाषेशी संबंधित माहिती तंत्रज्ञानाच्या उपकरणांना प्रकाशित करेल?

 • भारतवाणी, भारतीय भाषांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या आय.टी. उपकरणांना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करेल. हे जन संपर्क मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान (एमसीआईटी) यांच्यासोबत समन्वय स्थापित करेल. जे आपल्या विविध संस्था जसे- टीडीआईएल इत्यादींच्या माध्यमातून अशा उपकरणांच्या विकासासाठी त्या सोबत जुडलेले आहे. भाषेशी संबंधित विविध उपकरणे जसे- फॉन्ट, सॉफ्टवेअर, टंकन उपकरणे, मोबाईल अॅप्स, बहुभाषी अनुवाद उपकरणे, पाठ ते भाषण आणि भाषण ते पाठ इत्यादींसाठी उपलब्ध केले जाईल.

व्यापक स्तरावर समाजासाठी भारतवाणीचे काय फायदे आहेत?

 • भारतवाणी, भारतीय भाषांना / मातृ भाषांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देईल, ज्यामुळे युवा पिढी आपले सर्व ऑनलाई उपक्रम जसे- ब्लॉगिंग, सामाजिक मिडिया, इत्यादींसाठी मातृभाषेचा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
 • भारतवाणी, नष्ट होत चाललेल्या भाषा, अल्पसंख्यांक भाषा आणि आदिवासियांची भाषा / मातृ भाषा इत्यादींना इंटरनेटवर एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त करून देईल.
 • भारतवाणी, भारतातील जवळ-जवळ सर्व भाषा / मातृ भाषा त्याच बरोबर भारतातील सर्व समुदायांसोबत संपर्क स्थापित करण्यासाठी, दूर-दूरच्या क्षेत्रांपर्यंत पोहोचणे आणि सांस्कृतिक एकीकरण वाढण्यास प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल.

काय भारतवाणी सरकारी सूचनांना प्रकाशित करेल?

 • भारतवाणी प्रकल्पाचा संबंध कृषी, व्यापार, शिक्षण, सामाजिक क्षेत्र, वेळेवर सेवा पुरवणारे आणि इतर महत्वपूर्ण / आवश्यक पोर्टल यांच्याशी असेल, ज्यामुळे सर्व जनतेला एकाच पोर्टलवर ज्ञान आणि माहिती मिळेल.

भारतवाणीमध्ये कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे?

 • पहिल्या वर्षामध्ये अनुसुचीत २२ भाषा (आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मैथिली, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संथाळी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगु, आणि उर्दू) इत्यादींचा समावेश केला जाईल. त्यानंतर इतर भाषांचा क्रमानुसार समावेश केला जाईल.

भारतवाणीचे वास्तविक धेय्य काय आहे? भारतवाणीमध्ये प्रकाशित सामग्री कशा प्रकारची असेल?

 • भारतवाणी आपल्या कार्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षामध्ये प्राथमिकतेच्या आधारावर निर्धारित विषयातून संबंधित ज्ञान सामग्री एकत्र करेल. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक भाषा / मातृ भाषेशी संबंधित विशिष्ठ सामग्री तयार करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. सुरुवातीला विविध भाषांमध्ये सहज उपलब्ध सामग्रीला प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याची सुरुवात भारतीय भाषा संस्थान द्वारे प्रकाशित सामग्रीने होईल.
 • भारतवाणी निम्नलिखित कार्य पार पडेल.
 1. भाषा आणि साहित्याच्या लिखित टिप्पणाला डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात तय्यार करणे.
 2. लिपीच्या अक्षर संरचनेचे संकेत तय्यार करून मोजमाप करणे /तिचे नामांकन करणे.
 3. शब्दकोश आणि स्पष्टीकरण कोश तय्यार करणे.
 4. साहित्य (लिखित आणि वाचिक) आणि ज्ञानयुक्त ग्रंथांचा आधुनिक तसेच शास्त्रीय भाषांमध्ये अनुवाद.
 5. ऑनलाई भाषा शिक्षण, अध्ययन आणि भाषा शिक्षक प्रशिक्षण देईल आणि प्रमाणपत्र सुद्धा देईल, तसेच नियमितपणे व्यापक मुल्यांकनासोबत ऑनलाईन भाषा परीक्षण आणि मुल्यांकनावर सुद्धा लक्ष केंद्रित करेल.

काय भारतवाणीमध्ये प्रकाशित सामग्रीचा उपयोग निशुल्क केला जाऊ शकतो? भारतवाणीमध्ये सामग्रीवरील हक्क कसा सुरक्षित केला जाईल?

 • भारतवाणी, हे आधुनिक काळातील पोर्टल आहे ज्याचा उद्देश्य जनतेशी विशेषतः भारतीय नागरीकांशी ज्ञानाची देवाण-घेवाण करणे आहे. करिता भारतवाणी पोर्टलवर उपलब्ध सर्व सामग्रीला शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी निशुल्क उपयोगात आणले जाऊ शकते.
 • पोर्टल, भारतीय कॉपीराईट कायदा 1957 चे पालन करते,जे कलम 52 अनुसार कॉपीराईट उल्लंघनाअंतर्गत न येणाऱ्या अशा प्रकारच्या उपक्रमांना परवानगी देते.

काय खाजगी संस्था आणि व्यक्तींद्वारे भारतवाणीला सहायता केली जाऊ शकते? काय भारतवाणी सामग्री निर्माण करण्यासाठी मानधन देईल?

 • होय.ते आपल्या मूळ कथेत्तर साहित्य / ज्ञान सामग्रीला निशुल्क सार्वजनिक प्रयोगासाठी देतील. त्यांच्या सहयोगासाठी त्यांना लेखकाचा अधिकार दिला जाईल. अशा प्रकारे उपलब्ध सामग्रीचा स्वीकार करणे संपादक मंडळाच्या मान्यतेवर अवलंबून राहील.
 • भारतवाणी मातृभाषेत सामग्री प्रस्तुत करण्यासाठी ऑनलाईन उपकरणे उपलब्ध करून देईल.
 • सामग्रीचा शाश्वत प्रयोग करून मानधनाचे दर सल्लागार समितीकडून निर्धारित केले जातील, ज्यात मूळ सामग्री, सामग्रीची मौलिकता आणि विशेषताच्या आधारावर अर्थसहाय्य देण्याचे ठरवले जाईल.

शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांसाठी भारतवाणी कश्याप्रकारे सुगम होईल?

 • भारतवाणी, पोर्टल विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या दिशा-निर्देशांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या मापदंडांचे पालन करेल.
 • भारतवाणी, उपलब्ध भाषांमध्ये पाठ ते भाषणाची सुविधा निशुल्क स्वरुपात प्रदान करेल, ज्यामुळे आंधळे लोकसुद्धा संकेतस्थळाच्या सामग्रीचा उपयोग करू शकतील.

जर कोणी भारतवाणी पोर्टलवर उपलब्ध माहिती / सूचनेचा दुरुपयोग करत असेल, तर काय होईल?

 • भारतवाणी सामान्य जनतेवर विश्वास ठेवते. भारतवाणीच्या सामग्रीतून एखादी व्यक्ती साहित्यिक चोरी करते किंवा सामग्रीचा दुरुपयोग करत असेल तर ती पटकन आमच्या लक्षात येईल. भारतवाणी, भाषा शिकविणे आणि प्रसारीत करण्यासाठी आहे, ज्यामुळे भारतीय समाजाच्या समृद्ध वारश्याचे संरक्षण करण्यास मदत मिळते, आपल्या सामग्रीचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळते.

भारतवाणीची प्रशासकीय संरचना काय आहे?

 • भारतवाणीचे कार्यक्षेत्र
 1. प्रसिद्ध भाषावैज्ञानिक आणि विषय विशेषज्ञांच्या सल्लागार समितीद्वारे याचे कार्य चालत असते, ज्याचे अध्यक्ष भारतीय भाषा संस्थानाचे संचालक असतात. तज्ञ सल्लागार आणि समर्थन कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अंमलबजावणी संघाला मार्गदर्शन करेल.
 2. पोर्टल आणि भाषा उपकरणांच्या तांत्रिक बाबींविषयी एक तंत्रज्ञान सल्लागार समिती मार्गदर्शन करेल.

भारतवाणी हे ठिकाण कोठे आहे?

 • भारतवाणी हे ठिकाण भारतीय भाषा संस्थान, मैसूर कर्नाटकच्या परिसरात वसले आहे.

पत्र व्यवहाराचा पत्ता

भारतवाणी प्रकल्प

भारतीय भाषा संस्थान, मानसगंगोत्री, हुणसुर मार्ग, मैसूर-570006

दूरध्वनी क्र. +91-821-2515820 (संचालक)

स्वागत-कक्ष(रिसेप्शन) / PABX : +91-821-2345000

फैक्स: +91-821-2515032 (कार्यालय)

प्रकल्प ई-मेल : info@bharatavani.in

Search Dictionaries

Loading Results

Follow Us :   
  भारतवाणी अॅप डाउनलोड करा
  Bharatavani Windows App